Consultaxx Tax & Money Blog

सेक्शन २०६अब- आयकर परतावा न भरल्यास आकारण्यात येणारा दंड

Article Navigation

Reading Time: 2 minutes

सामग्री सारणी-

१.निर्दिष्ट व्यक्ती (Specified Persons) म्हणजे काय?

२.TDS उच्च दरावर वजा करण्याच्या अटी

३.सेक्शन २०६अब ला असलेले अपवाद

४.निर्दिष्ट व्यक्ती ओळखण्यासाठीची अनुपालन तपास सेवा (Compliance check facility)

४.१. पॅन शोध

५.सेक्शन २०६अब अनुसार TDS चा दर

सेक्शन २०६अब मध्ये दिलेल्या तरतुदींनुसार ज्या निर्दिष्ट व्यक्तीने मागील २ आर्थिक वर्षात आयकर परतावे भरले नसतील, तर त्या व्यक्तीसाठी आकारला जाणारा TDS चा दर हा उच्च असतो. 

१.निर्दिष्ट व्यक्ती म्हणजे काय?

निर्दिष्ट व्यक्ती म्हणजे आयकर भरणारी व्यक्ती जी खालील अटींची पूर्तता करते.

• ज्या व्यक्तीने मागील वर्षाच्या लगेचच आधीच्या २ आर्थिक वर्षांमध्ये आयकर परतावे भरायला हवे होते पण ते भरले नसतील.

• निर्दिष्ट व्यक्तीने भरावयाचा मागील २ आर्थिक वर्षातील 

TDS (Tax deducted at source) आणि TCS (Tax collected at source) यांची एकूण ही रुपये ५०००० किंवा त्यापेक्षा जास्त असेल.

म्हणूनच या कारणासाठी आपण म्हणू शकतो की, सेक्शन २०६अब प्रमाणे TDS वजा करायचा असल्यास पुढच्या मुद्द्यामध्ये दिलेल्या अटींची पूर्तता व्हायला हवी.

२.TDS उच्च दरावर वजा करायच्या अटी

जर खाली दिलेल्या अटींची पुर्तता होत असल्यास तुम्हाला सेक्शन २०६अब प्रमाणे TDS उच्च दरावर वजा करायला लागेल.

• जर करधारकाने मागील वर्षाच्या लगेचच आधीच्या २ आर्थिक वर्षांचे आयकर परतावे भरायला हवे होते पण ते भरले नसतील तर

• आयकर परतावे भरण्याची वेळेची मर्यादा संपली असेल तर

• मागील २ आर्थिक वर्षातील भरावा लागणारा TDS आणि TCS यांची एकूण रक्कम रुपये ५०००० किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर

३.सेक्शन २०६अब ला असलेले अपवाद

सेक्शन २०६अब च्या तरतुदी खालील गोष्टींसाठी लागू होत नाहीत.

१.जिथे TDS च्या सेक्शन्सप्रमाणे TDS वजा करण्याची गरज असते :

• सेक्शन १९२- पगारावर आकारण्यात येणारा TDS

• सेक्शन १९२अ- प्रॉव्हिडंट फंड परिपक्वतेच्या आधी ते पैसे काढल्यास त्यावर आकारला जाणारा TDS 

• सेक्शन १९४ब- लॉटरी, पत्त्यांचे खेळ, पझल्स जिंकल्यावर मिळण्याऱ्या रक्कमेवर आकारला जाणारा TDS

• सेक्शन १९४बब- घोड्यांची शर्यत जिंकल्यावर मिळणाऱ्या रक्कमेवर आकारला जाणारा TDS

• सेक्शन १९४लबक- सिक्युरिटायझेशन ट्रस्ट मध्ये केलेल्या गुंतवणूकीवर आकारला जाणारा TDS

• सेक्शन १९४न- पैसे काढलेल्या रक्कमेवर आकारला जाणारा TDS

२.जे करधारक हे भारताचे रहिवासी नसतील. शिवाय ज्यांचे कायमस्वरूपी राहण्याचे ठिकाण हे भारतामध्ये नसेल. 

४.निर्दिष्ट व्यक्ती ओळखण्यासाठीची अनुपालन तपास सेवा (Compliance check facility) 

आयकर विभागाने आपला एका नवीन प्रणालीसोबत परिचय करून दिला आहे, त्या नवीन प्रणालीचे नाव आहे ‘सेक्शन २०६अब आणि २०६ककअ साठी अनुपालन तपास’. तुम्ही ह्या सेवेचा लाभ आयकर विभागाच्या रिपोर्टिंग पोर्टलवरून घेऊ शकता, म्हणजेच, https://report.insight.gov.in/reporting-webapp/portal/homepage या लिंकचा वापर करून

४.१. पॅन शोध

तुम्ही तुमच्या पॅन आणि ओळखीची माहिती तेथे भरूनदेखील शोधू शकता. त्याचप्रमाणे तेथे सिंगल पॅन आणि मल्टिपल पॅनने शोधायचे देखील पर्याय उपलब्ध आहेत. त्या पोर्टलवर तुम्ही केलेल्या शोधाचे निकाल हे PDF या Format मध्ये डाउनलोड होतील, तर Bulk शोधामध्ये त्या शोधाचे निकाल हे डाऊनलोडेबल फाइल या फॉर्ममध्ये होतील. 

आयकर विभाग निर्दिष्ट व्यक्तींची यादी आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला घोषित करते.

म्हणजे, जर तुमचे नाव हे निर्दिष्ट व्यक्तींच्या यादीमध्ये असेल, तर तुम्ही मागील दोन किंवा एका आर्थिक वर्षात आयकर परतावा भरला नसेल. या कारणामुळे तुम्ही सेक्शन २०६अब प्रमाणे TDS चा उच्च दर भरण्यासाठी पात्र आहात.

५. सेक्शन २०६अब अनुसार TDS चा दर

सेक्शन २०६अब अनुसार भरावा लागणारा कर हा खालील दिलेल्या पर्यायांपैकी जो पर्याय सर्वात उच्च असेल तो-

• ५% या दराप्रमाणे

• विशिष्ट तरतुदीनुसार दिलेल्या दराच्या दुप्पट दर

• सध्या आकारण्यात येणाऱ्या दराच्या दुप्पट दर

जर करधारकाने त्याच्या पॅनबद्दलची माहिती दिलेली नसल्यास किंवा त्याचे पॅन उपलब्ध नसल्यास, TDS चा दर हा २०% किंवा या तरतुदीनुसार जो दर लागू आहे यामधील जी रक्कम सर्वात जास्त असेल ती रक्कम आकारण्यात येते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

fill & click submit
to whatsapp us