Consultaxx Tax & Money Blog

भाडेकरुंच्या पोलीस पडताळणी बद्दलच्या कायदेशीर तरतुदी

Article Navigation

Reading Time: 2 minutes

कायद्यानुसार घरमालकाने भाडेकरूची योग्य ती पोलीस पडताळणी करून घेणे हे अनिवार्य आहे. जर या कायद्याचे पालन न झाल्यास त्या व्यक्तीला एक महिन्याचा कारावास किंवा २०० रुपयांचा दंड इंडियन पेनल कोडच्या सेक्शन १८८ प्रमाणे भोगावा लागेल. इंडियन पेनल कोडच्या सेक्शन १८८ प्रमाणे एखाद्या व्यक्तीने कायद्याचे पालन न केल्यास त्या व्यक्तीवर कायदेशीररित्या कारवाई होऊ शकते पण बरेच वेळा भाडेकरूंची योग्य ती पडताळणी करून घेण्याची ही गरज घरमालकांकडून दुर्लक्षित केली जाते. भाड्याने जागा देताना केलेला हा निष्काळजीपणा हा फक्त जागेसाठी धोकादायक नसून तो घरमालकासाठी देखील धोकादायक ठरू शकतो. जर तुमचा भाडेकरू कोणत्या गुन्ह्यामध्ये सहभागी असेल, तर भाडेकरूच्या निष्काळजीपणासाठी घरमालक म्हणून तुम्ही देखील जबाबदार धरले जाऊ शकता. 

सरकारने Draft Model Tenancy Act, २०१९ ह्या कायद्यामध्ये जागा भाड्याने देण्याला प्रोत्साहन दिले आहे. शिवाय घरमालक आणि भाडेकरुमधले नाते हे अधिकाधिक किफायतशीर कसे होईल याला महत्व दिले आहे. तर घरमालकांना त्यांची जागा भाड्याने देताना अजून काही अडचणींना देखील सामोरे जावे लागते. जर भाडेकरूने भाड्याने घेतलेल्या जागेवरती काही अनधिकृत काम केल्यास घरमालकाला देखील कायदेशीररित्या जबाबदार धरण्यात येते.

  • भाडेकरुंच्या पोलीस पडताळणीचे काय महत्व आहे?

भाडेकरूंची केलेली पोलीस पडताळणी तुम्ही भाड्याने दिलेल्या जागेमध्ये होणारे बेकायदेशीर काम रोखण्यास मदत करते. जसे की, ड्रग्सचे सेवन, रेव्ह पार्टी, इत्यादी. त्यामुळे जर भाडेकरूंची पोलीस पडताळणी होणार असल्यास ते कोणतेही असे बेकायदेशीर काम भाड्याच्या जागेवर करण्यापूर्वी विचार करून करतात. भाडेकरूंच्या पोलीस पडताळणीमुळे घरमालकाला देखील सुरक्षित वाटते आणि त्याच्या मनात शाश्वती निर्माण होण्यास मदत होते की, त्याने त्याची जागा एका चांगल्या अश्या व्यक्तीला भाड्याने दिली आहे. जर घरमालक दुसऱ्या शहरात किंवा देशात राहत असेल तर भाडेकरूंची केलेली ही पोलीस पडताळणी अजून फायदेशीर ठरते. करार संपला असला तरी काही विदेशी नागरिक हे ठरलेल्या काळापेक्षा जास्त काळ आपल्या देशामध्ये राहतात आणि लहान शहरात नोकरी शोधतात. ते नागरिक या भाडेकरूंच्या केलेल्या पोलीस पडताळणीमुळे ओळखण्यास मदत होते. 

  • भाडेकरूंच्या पोलीस पडताळणीचे प्रकार

तुमच्या भाडेकरूंची पोलीस पडताळणी करून घ्यायचे दोन प्रकार आहेत. त्याबद्दल अधिक माहिती खालीलप्रमाणे-

.भाडेकरूंची ऑफलाईन पोलीस पडताळणी

१.तुम्ही तुमच्या जवळच्या स्थानिक पोलीस स्टेशनला भेट द्या. 

२.त्यानंतर भाडेकरुंच्या पडताळणीसाठी असलेला नियोजित Form भरा. हा Form तुम्हाला तुमच्या जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये किंवा पोलीस स्टेशनच्या वेबसाईटवरून देखील मिळू शकतो. 

३.Form भरून झाल्यावर तो पोलीस स्टेशनमधल्या Sub-Inspector कडे जमा करावा.

.भाडेकरूंची ऑनलाइन पोलीस पडताळणी

ही सेवा फक्त दिल्ली, मुंबई आणि पुणे या शहरांसाठी उपलब्ध आहे. तुम्ही तुमच्या राहण्याच्या ठिकाणासहित भाडेकरूंची ऑनलाइन पोलीस पडताळणी असे गुगलवर शोधू शकता. जर तुमच्या राहण्याच्या ठिकाणी ही सेवा उपलब्ध असेल, तर तुम्हाला गुगलने शोधलेल्या निकालांमध्ये तसे दिसून येईल शिवाय घरमालकाने त्याच्या भाडेकरुसोबत झालेला Leave and Licence चा करार हा Register करायला हवा आणि त्याच्या भाडेकरुबद्दलची माहिती स्थानिक पोलीस स्टेशनला द्यायला हवी. 

  • ऑनलाइन पडताळणीसाठीचा फॉर्म भरताना लागणारी माहिती खालीलप्रमाणे

घरमालकाची लागणारी माहिती

१.फोटोची सॉफ्टकॉपी

२.पूर्ण नाव

३.संपर्क क्रमांक

४.Email ID

५.बाकी हवी असलेली माहिती जी ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी उपयुक्त पडेल.

भाड्याने देत असलेल्या जागेची माहिती

१.भाड्याने देत असलेल्या जागेचा पूर्ण पत्ता

२.Leave and Licence करार सुरूवात होण्याची तारीख आणि समाप्तीची तारीख

भाडेकरूची लागणारी माहिती

१.भाडेकरुचे नाव

२.फोटोची सॉफ्टकॉपी

३.पूर्ण पत्ता

४.ओळखपत्राचा क्रमांक (आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र, रेशन कार्ड, वाहन चालक परवाना यामधील कोणतेही)

५.जमा करत असलेल्या ओळखपत्राची एक कॉपी

६.व्यवसाय

७.संपर्क क्रमांक

८.Email ID

९.भाडेकरूच्या कामाच्या ठिकाणाचा पत्ता

भाडेकरूच्या ओळखीच्या व्यक्तींबद्दलची लागणारी माहिती

१.नाव आणि संपर्क क्रमांक

२.Agent चे नाव (जर उपस्थित असल्यास)

३.Agent चा संपर्क क्रमांक 

  • ऑनलाइन पडताळणी करण्यासाठी करावी लागणारी प्रक्रिया खालीलप्रमाणे

१.ह्या खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करावे.

लिंक- http://www.mhpolice.maharashtra.gov.in/Citizen/Login.aspx

२.त्यानंतर ड्रॉप-डाऊन मेनूमधून ‘Online Services’वरती क्लिक करावे.

३.त्यानंतर ‘Create a Citizen Login’वरती क्लिक करावे. तेथे हवी असलेली माहिती भरून तुमचे स्वतःचे Account तयार करावे. 

४.स्वतःचे Account तयार झाल्यावर त्या Account मध्ये Login करावे. Login केल्यावर ‘Citizen Services’ ‘Tenant/PG Information Request’ → ‘Add Tenant/PG Information Detail’या सगळ्या पर्यायांवरती click करावे.

५.तिथे हवी असलेली संपूर्ण माहिती भरून Submit करावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

fill & click submit
to whatsapp us