Reading Time: 3 minutes

सामग्री सारणी-

१.म्युच्युअल फंडमधून मिळणाऱ्या Dividend उत्पन्नावर सेक्शन १९४क अनुसार TDS वजा करण्याची गरज

२.सेक्शन १९४क ची व्याप्ती

३.सेक्शन १९४क अनुसार TDS वजा करण्यासाठी असलेली मर्यादा

३.१.सेक्शन १९४क अनुसार TDS वजा करण्यासाठी असलेले अपवाद

३.२.सेक्शन १९४क अनुसार आकारण्यात येणारा TDS चा दर

३.३.सेक्शन १९४क अनुसार TDS वजा करण्यासाठीची वेळ

३.४.सेक्शन १९४क अनुसार TDS सर्टिफिकेट आणि TDS रिटर्न 

आधी सेक्शन १०(३५) प्रमाणे म्युच्युअल फंड युनिट्समधून मिळणारे उत्पन्न हे exempt होते. पण वित्तीय बिल, २०२० प्रमाणे सरकारने म्युच्युअल फंड युनिट्समधून येणाऱ्या उत्पन्नावर TDS वजा करण्याशी सगळ्यांचा परिचय करून दिला. 

आता आयकर कायदा, १९६१ च्या सेक्शन १९४क प्रमाणे जी व्यक्ती म्युच्युअल फंडवरील Dividend ची रक्कम इतरांना भरते, ती व्यक्ती ती रक्कम एका आर्थिक वर्षात भरताना ज्या रहिवासी गुंतवणूकदाराचे Dividend चे उत्पन्न हे रुपये ५००० च्या वरती असेल, त्या गुंतवणूकदारासाठी TDS १०% या दराप्रमाणे आकारण्यात येईल. 

सेक्शन १९४क हे १ एप्रिल २०२० रोजी परीचयास आले आणि म्हणूनच ते आर्थिक वर्ष २०२०-२१ पासून लागू करण्यात आले. 

१. म्युच्युअल फंडमधून मिळणाऱ्या Dividend उत्पन्नावर सेक्शन १९४क अनुसार TDS वजा करण्याची गरज

सेक्शन १९४क च्या आधी Dividend उत्पन्नावर दुप्पट वेळा कर आकारला जायचा. पहिल्यांदा जेव्हा कंपन्यांकडून म्युच्युअल फंड कंपन्यांना Dividend भरला जायचा तेव्हा आणि दुसऱ्यावेळी जेव्हा म्युच्युअल फंड कंपन्यांकडून गुंतवणूकदारांना Dividend भरला जायचा तेव्हा त्यांना Dividend वितरण कर (Dividend Distribution Tax) भरायला लागायचा. 

आता सेक्शन १९४क च्या परिचयानंतर Dividend वितरण कर रद्द करण्यात आला आहे आणि आता फक्त म्युच्युअल फंड कंपन्या गुंतवणूकदारांच्या Dividend उत्पन्नावर TDS वजा करण्यासाठी जबाबदार आहेत. 

२. सेक्शन १९४क ची व्याप्ती

सेक्शन १९४क अनुसार कोणतीही व्यक्ती जी इतर रहिवाश्याला खाली दिलेले उत्पन्न भरण्यासाठी जबाबदार आहे-

• सेक्शन १०(२३ड) प्रमाणे म्युच्युअल फंड युनिट्स

• प्रशासकाचे युनिट्स

• Specified कंपन्यांचे युनिट्स जे सेक्शन १९४क प्रमाणे TDS वजा करण्यासाठी जबाबदार आहेत. 

त्यामुळे आपण येथे म्हणू शकतो की, 

म्युच्युअल फंड कंपन्या ज्या Dividend चे गुंतवणूकदारांमध्ये वितरण करतात त्यांना आपण ‘वजाकर्ता’ (Deductor) असे म्हणू शकतो. त्या कंपन्या Dividend उत्पन्नावर TDS वजा करण्यासाठी आणि सरकारला तो TDS भरण्यासाठी जबाबदार आहेत. जे रहिवाशी गुंतवणूकदार त्या म्युच्युअल फंडवरती उत्पन्न कमावतात त्या गुंतवणूकदारांना ‘वजावट’ (Deductee) असे आपण म्हणू शकतो.

महत्वाची माहिती- ज्या व्यक्ती भारताच्या रहिवासी किंवा भागधारक नाही आहेत, त्या व्यक्ती सेक्शन १९५ मध्ये धरण्यात आल्या आहेत. 

३. सेक्शन १९४क अनुसार TDS वजा करण्यासाठी असलेली मर्यादा

जर वजाकर्ता Dividend ची रक्कम ही रुपये ५००० पेक्षा जास्त भरत असेल, तर वजाकर्त्याने त्या रक्कमेवर TDS वजा करायला हवा. पण TDS हा खाली दिलेल्या घटनांमध्ये वजा करण्यात येत नाही. 

३.१. सेक्शन १९४क अनुसार TDS वजा करण्यासाठी असलेले अपवाद 

• जर मिळालेले उत्पन्न हा भांडवली लाभ (Capital gain) असेल.

• जर एका आर्थिक वर्षात Dividend पासून मिळणारे उत्पन्न हे रुपये ५००० पर्यंत असेल.

३.२.सेक्शन १९४क अनुसार आकारण्यात येणारा TDS चा दर

• भारतीय रहिवासी असल्यास-

सेक्शन १९४क अनुसार आकारण्यात येणारा TDS चा दर हा १०% एवढा आहे. जर प्राप्तकर्त्याने त्याच्या पॅनबद्दलची माहिती दिली नसल्यास TDS हा २०% ह्या दराने वजा करण्यात येतो. 

• भारतीय रहिवासी नसल्यास-

TDS हा सेक्शन १९५ प्रमाणे वजा करण्यात येतो. 

३.३.सेक्शन १९४क अनुसार TDS वजा करण्यासाठीची वेळ

TDS हा खाली दिलेल्या रक्कमांपैकी जी रक्कम सर्वात कमी असेल त्यावर वजा करण्यात येतो.

• प्राप्तकर्त्याच्या बँक खात्यामध्ये असलेल्या Dividend च्या रक्कमेवर, किंवा

• Dividend त्या व्यक्तीला भरायच्या वेळी

३.४.सेक्शन १९४क अनुसार TDS सर्टिफिकेट आणि TDS रिटर्न

TDS सरकारला भरल्यानंतर वजाकर्त्याने TRACES या पोर्टलवर TDS रिटर्न फॉर्म 26क्यू मध्ये त्रैमासिकरित्या भरायला हवा. 

वजाकर्ता TRACES पोर्टलवरून फॉर्म १६अ (Tax Credit Certificate) डाउनलोड करून तो वजावट (Deductee) ला देऊ शकतो. फॉर्म १६अ च्या मदतीने वजावट त्याचा आयकर भरताना त्या TDS च्या जमा रक्कमेचा दावा करू शकतो.

fill & click submit
to whatsapp us