महाराष्ट्रात भाडे करार करण्याचे आणि तो नोंदवण्याचे दोन मार्ग आहेत. महाराष्ट्र राज्य सरकारने भाडे करार ऑनलाइन पध्दतीने करायची सेवा ही सुरू केली आहे.
१.१.पॉवर ऑफ अटॉर्नीच्या सहाय्याने
१.२.त्या व्यक्तीचे दुसऱ्या विशिष्ट ठिकाणी बायोमेट्रिक हे घेण्यात येते.
दुसरा मार्ग हा सर्वात सोपा आणि कमी खर्चिक असा आहे. ज्यामध्ये भाडे करार नोंदणीसाठीचे एजंट हे तुम्हाला तुम्ही असलेल्या वेगळ्या ठिकाणी किंवा शहरात येऊन तुमची भेट घेतात आणि तुमच्या अंगठ्याचे बायोमेट्रिक आणि फोटो हा घेण्यात येतो. यासाठी त्या एजंटला त्याचा स्वतःचा लॅपटॉप आणि UIDAI मध्ये नोंदणी केलेले बायोमेट्रिक उपकरण हे दोन्ही सोबत घेऊन यावे लागते आणि पूर्ण प्रक्रिया ही करून घ्यावी लागते. ही प्रक्रिया साधीसोपी असली तरी पण बरेच वेळा एखाद्या व्यक्तीचे ठिकाण किंवा शहर हे महाराष्ट्राच्या किंवा भारताच्या बाहेर असते आणि खऱ्या अर्थाने बघता ते बायोमेट्रिक त्या एजंटला तेथे जाऊन करून घेणे हे कठीण असते.
(आम्ही Consultaxx तर्फे बऱ्याच ठिकाणी भाडे कराराबद्दलची सेवा देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामध्ये पूर्ण महाराष्ट्र राज्य, भारतामध्ये दिल्ली, गुजरात, बँगलोर ही राज्ये आणि भारताबाहेर दुबई, शारजाह, अबुधाबी, USA हे देश.. जे लोक या दिलेल्या ठिकाणी असतील, ते लोक भाडे करार हा पॉवर ऑफ अटॉर्नी न बनवता तो बनवून त्याची नोंदणी ही देखील ऑनलाइन पध्दतीने करू शकतात.
आता आपण पहिला मार्ग म्हणजेच पॉवर ऑफ अटॉर्नीच्या सहाय्याने भाडे कराराची नोंदणी करणे याबद्दल बोलूया. जर एखादी व्यक्ती भारताबाहेर असेल, तर त्या व्यक्तीला पॉवर ऑफ अटॉर्नी ही परदेशात बनवावी लागते किंवा भारतामधील सबरजिस्ट्रार समोर दाखवण्यासाठी ती वकीलाकडून किंवा भारतीय दूतावास अधिकाऱ्याकडून प्रमाणित करून घ्यावी लागते. साधारण बघता हा मार्ग खर्चिक असा आहे, पण जे लोक परदेशात राहतात किंवा वेगळ्या शहरात राहतात त्या लोकांसाठी हा एक कायमस्वरूपी उपाय म्हणता येईल.
पॉवर ऑफ अटॉर्नी हे एक कायदेशीर दस्तऐवज आहे. याच्या सहाय्याने एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला त्याचा कायदेशीर प्रतिनिधी म्हणून घोषित करते. म्हणजेच याद्वारे आपण त्या घोषित व्यक्तीला काही हक्क देऊ करतो की, ज्यामुळे ती व्यक्ती आपल्याला बरोबर वाटेल त्याप्रमाणे आणि ज्या गरजेच्या कृती असतील त्याप्रमाणे कार्य करेल.
पॉवर ऑफ अटॉर्नीचे दोन प्रकार आहेत-
१.सामान्य पॉवर ऑफ अटॉर्नी
२.विशेष पॉवर ऑफ अटॉर्नी
सामान्य पॉवर ऑफ अटॉर्नीद्वारे एखाद्या व्यक्तीला एखाद्या मालमत्तेबद्दल किंवा घटनेबद्दल गरजेच्या कृती करण्यासाठी ब्लॅंकेट मान्यता देण्यात येते. उदाहरणार्थ- एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला त्याच्या तर्फे एखाद्या मालमत्तेची खरेदी आणि त्याबद्दलचा खरेदी करार करण्याची मान्यता देऊ शकते. म्हणजेच या घटनेमध्ये घोषित केलेली व्यक्ती मालमत्तेच्या मालकाच्या वतीने मालमत्तेबद्दलच्या करारासाठीच्या सगळ्या गरजेच्या कृती करते आणि नोंदणी प्राधिकरण समोर हजर राहून त्या कराराची नोंदणी आणि त्या मालमत्तेशी निगडीत सर्व कृती करते.
विशेष पॉवर ऑफ अटॉर्नीमध्ये एखादी व्यक्ती त्या मालमत्तेशी किंवा घटनेशी निगडीत दुसऱ्या व्यक्तीला विशेष हक्क देऊ करते. उदाहरणार्थ- भारतामधील भाडे कराराशी निगडीत पॉवर ऑफ अटॉर्नीमध्ये दुबईमध्ये राहणारी व्यक्ती ही भारतामधील व्यक्तीला त्याच्यातर्फे भाडे करार करण्यासाठी आणि तो करार नोंदवताना नोंदणी प्राधिकरण समोर हजर राहण्यासाठीचे विशेष हक्क देऊ करते किंवा एखादी व्यक्ती त्यांच्यातर्फे एखाद्या विशिष्ट सरकारी खात्यासमोर हजर राहायचे विशेष हक्क त्या व्यक्तीला देऊ करते.
म्हणजे सांगितल्याप्रमाणे असे कागदपत्र ज्याद्वारे एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला सामान्य किंवा विशेष हक्क हे त्यांच्यातर्फे करण्यासाठी घोषित करते, त्या कागदपत्राला पॉवर ऑफ अटॉर्नी असे म्हणण्यात येते.
पॉवर ऑफ अटॉर्नी ती व्यक्ती बनवू शकते, ज्या व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीला त्यांच्यातर्फे भाडे करार करण्यासाठी आणि नोंदणी प्राधिकरण समोर हजर राहण्यासाठी घोषित करायचे आहे. पॉवर ऑफ अटॉर्नी बनवणारी व्यक्ती ही कोणतीही असू शकते. म्हणजेच ती भाडेकरूकडून देखील बनवण्यात येऊ शकते किंवा मालकाकडून देखील बनवण्यात येऊ शकते. सामान्यतः भाडे करारासाठी पॉवर ऑफ अटॉर्नी ही खालील व्यक्तींकडून बनवण्यात येते:
३.१.मालमत्तेचा मालक जो मालमत्तेच्या ठिकाणाऐवजी दुसऱ्या ठिकाणी, दुसऱ्या शहरात किंवा परदेशात राहत असेल आणि जो स्वतः भाडे कराराच्या नोंदणीसाठी हजर राहू शकत नाही.
३.२.मालमत्तेचा मालक ज्याच्या वयामुळे किंवा इतर काही कारणांमुळे UIDAI च्या उपकरणाद्वारे त्याचे बायोमेट्रिक हे घेण्यात येऊ शकत नसेल.
पॉवर ऑफ अटॉर्नी जर परदेशात बनवण्यात आली असेल आणि परदेशी वकीलाकडून प्रमाणित करण्यात आली असेल, तर ती पॉवर ऑफ अटॉर्नी भारतामधील सबरजिस्ट्रार समोर नोंदणी करण्याची गरज नाही आहे.
जर पॉवर ऑफ अटॉर्नी ही भारतामध्ये बनवण्यात आली असेल, तर ती नोंदणी प्राधिकरण कडून नोंदणीकृत करून घेणे हे अनिवार्य आहे.
भाडे करारामध्ये परदेशामधील पॉवर ऑफ अटॉर्नी जी नोंदणीकृत केलेली नाही आहे आणि भारतीय रहिवाश्याने केलेली पॉवर ऑफ अटॉर्नी जी करार बनवण्याच्या दिवशी त्यामध्ये घोषणेबद्दलचा उल्लेख हा केलेला असेल, तर ही कागदपत्रे भाडे करारासाठी करण्यात येणारी पॉवर ऑफ अटॉर्नी नोंदवण्यासाठी पुरेशी आहेत.
परदेशामध्ये भारतासाठी बनवलेल्या पॉवर ऑफ अटॉर्नीची किंमत ही साधारणपणे रुपये ७,०००/- ते २०,०००/- च्या दरम्यान असते. भारतीय रहिवाश्याने भारतामध्ये बनवलेली पॉवर ऑफ अटॉर्नीची किंमत ही त्या मानाने कमी असते आणि जी साधारणपणे रुपये ५,०००/- ते ७,०००/- च्या दरम्यान असते.
भारतीय रहिवाश्याने बनवलेली पॉवर ऑफ अटॉर्नी आणि घोषणापत्र नोटराइज्ड करण्यासाठी साधारणपणे रुपये ५,०००/- एवढा खर्च येतो.
दिलेल्या किंमती या सुचकपणे देण्यात आलेल्या आहेत आणि या निश्चित किंमती नाही आहेत. प्रत्येकाने पॉवर ऑफ अटॉर्नी निवडताना आणि बनवताना स्वतःच्या ज्ञानाचा आणि निर्णयाचा योग्य तो उपयोग करून घ्यावा.
पॉवर ऑफ अटॉर्नी ही आपण कोणत्याही व्यक्तीला देऊ शकतो. भाडे करारासाठी असलेली पॉवर ऑफ अटॉर्नी ही अश्या व्यक्तीला देणे श्रेयस्कर आहे की, जी व्यक्ती ही भाडे करार करण्यासाठी सहजपणे उपलब्ध होऊ शकते. ती व्यक्ती म्हणजे-
६.१.नातेवाईक
६.२.मित्र किंवा मैत्रीण
६.३.मालमत्ता व्यवस्थापन एजन्सी
६.४.घराची सर्व व्यवस्था पाहणारी व्यक्ती
जेव्हा तुम्ही फक्त भाडे करारासाठी पॉवर ऑफ अटॉर्नी देत असता, तेव्हा ती विशेष पॉवर ऑफ अटॉर्नी ही भाडे करार बनवण्यासाठी देण्यात आलेली असावी आणि तीही विशिष्ट कालावधीसाठी देण्यात आलेली असावी. पॉवर ऑफ अटॉर्नी देताना एखाद्या व्यक्तीने पॉवर ऑफ अटॉर्नी देण्यात येणाऱ्या व्यक्तीबद्दलची विश्वासार्हता, पॉवर ऑफ अटॉर्नीचा कालावधी आणि पॉवर ऑफ अटॉर्नीमध्ये असलेले शब्द हे गोंधळात टाकणारे नसावेत आणि पॉवर ऑफ अटॉर्नी देण्यात येणाऱ्या व्यक्तीला इतर हक्क हे देण्यात येऊ नयेत.
सामान्यतः पॉवर ऑफ अटॉर्नीची पद्धत ही काहीही धोका नसलेली आहे. पॉवर ऑफ अटॉर्नीवर आधारीत बनवलेला भाडे करार हा आजकाल खूप साधारण असा झालेला आहे आणि प्रत्येक व्यक्ती ही त्या कागदपत्राच्या मर्यादा आणि सीमा ह्या जाणून आहेत.
पॉवर ऑफ अटॉर्नी आधारित बनवण्यात आलेला भाडे करार हा पूर्णपणे सुरक्षित आणि कायदेशीर आहे. या पद्धतीने तुम्ही मालमत्ता व्यवस्थापकाला भाडे करार बनवण्यासाठी आणि मालमत्ता देखभाल करण्यासाठीचे हक्क देऊ शकता आणि तुमचा वेळ आणि उर्जा वाया न घालवता तुम्ही कायदेशीररित्या भाडे करार हा बनवू शकता.
आम्ही Consultaxx तर्फे लोकांना पॉवर ऑफ अटॉर्नीवर आधारित भाडे करार बनवून नोंदवण्यासाठी मदत करतो आणि त्याचप्रमाणे भाडे करार बनवण्यासाठी आणि विशिष्ट मालमत्तेचे व्यवस्थापन करण्यासाठी देखील पॉवर ऑफ अटॉर्नी घेतो.
महाराष्ट्रात किंवा भारतामध्ये असलेल्या मालमत्तेसाठी असलेली पॉवर ऑफ अटॉर्नी ही अनेक मार्गांनी बनवता येऊ शकते आणि ती पूर्णपणे कायदेशीर देखील असते. जरी हा व्यवहार खर्चिक वाटत असला, तरी त्यासाठी येणारा खर्च हा एकदाच येतो आणि तुम्ही परदेशात असून देखील भाडे करार हा बनवू शकता व त्यामुळे तुम्हाला दीर्घकालीन सुविधा मिळण्यास मदत होते.
भाडे करारासाठी लागणारी पॉवर ऑफ अटॉर्नी आणि त्याबद्दलची अधिक सामान्य माहिती ही त्या विशिष्ट देशाच्या भारतीय दूतावासाच्या खाली देण्यात आलेल्या साईटवरून मिळू शकते.
९.१.USA मधून भारतासाठी बनवण्यात येणारी पॉवर ऑफ अटॉर्नी-
https://www.indianembassyusa.gov.in/extra?id=10
९.२.UAE मधून भारतासाठी बनवण्यात येणारी पॉवर ऑफ अटॉर्नी-
https://www.cgidubai.gov.in/page/attestation-services/
९.३.जपान मधून भारतासाठी बनवण्यात येणारी पॉवर ऑफ अटॉर्नी-
https://www.indembassy-tokyo.gov.in/consularandpassportservices.html
तुम्ही तुमचा भाडे करार हा आमच्या मदतीने पॉवर ऑफ अटॉर्नीमार्फत नोंदणी करून घेऊ शकता आणि त्याबद्दलच्या अधिक माहितीसाठी आम्हाला संपर्क देखील करू शकता.