Reading Time: 2 minutes
Points to consider in a Gift Deed

Table of Contents

भेट करारनामा हे एक महत्वाचे कायदेशीर दस्तऐवज असून ते मालमत्तेचा मालकी हक्क एका मालकाकडून दुसऱ्या मालकाकडे हस्तांतरित करते. आजच्या या लेखामध्ये आपण या महत्वाच्या कागदपत्राविषयी जाणून घेऊया. 

 

मालमत्ता हस्तांतरण कायद्यामधील सेक्शन १२२ मध्ये नमूद केल्याप्रमाणे भेट करारनामा हे एक कायदेशीर दस्तऐवज असून ती भेट ही अधिकृत असल्याचे सिद्ध करते. त्या कागदपत्रावर भेट देणाऱ्या आणि घेणाऱ्या अश्या दोन्ही व्यक्तींची सही असणे गरजेचे आहे. भेट करारनाम्यामध्ये मालमत्ता, भेट देणारा आणि घेणारा अश्या सगळ्याबद्दलची माहिती दिलेली असते. 

नोंदणी केलेला भेट करारनामा हा भेटीचे हस्तांतरण भेट घेणाऱ्या व्यक्तीकडे लगेच झाल्याचा एक पुरावा असतो आणि तो करारनामा अंमलात आणण्यासाठी एखाद्या व्यक्तीला कोर्टमध्ये जाण्याची गरज नसते. 

१.भेट करारनाम्यात कोणकोणत्या भेटी या पात्र आहेत?

स्थलांतरित करता येण्यासारखी किंवा अचल मालमत्ता आणि अस्तित्वात असलेली हस्तांतरणीय मालमत्ता तुम्ही भेट म्हणून देऊ शकता आणि या भेटींसाठी भेट करारनाम्याची गरज असते. भेट हस्तांतरण करायच्या वेळी भेट देणारा हा दिवाळखोर नसावा आणि दुसरं म्हणजे भेट देणारी गोष्ट ही स्पर्श करता येईल अशी आणि हस्तांतरण करता येईल अशी असावी. 

२.भेट करारनाम्याची नोंदणी

भेट करारनाम्याची नोंदणी हा एक आवश्यक असलेला कायदेशीर व्यवहार आहे. भेट करारनामा हा नोंदणी कायदा, १९०८ च्या सेक्शन १७ प्रमाणे नोंदणीकृत करून घेणे अनिवार्य आहे. 

 

३.भेट करारनाम्याचा मसुदा तयार करण्याची आणि नोंदणी करण्याची प्रक्रिया

१.भेट करारनाम्याच्या मसुद्यामध्ये भेट देणाऱ्याची आणि घेणाऱ्याची माहिती म्हणजेच नाव, पत्ता, जन्मतारीख, नाते, मालमत्तेचा तपशील, वितरणाबद्दलची माहिती ही सगळी माहिती नमूद केलेली असावी. 

२.दोन साक्षीदारांच्या उपस्थितीत भेट देणाऱ्या आणि घेणाऱ्या व्यक्तींची सही

३.ही सगळी माहिती स्टॅम्प पेपरवर प्रिंट केलेली असावी.

४.हा करार उपनिबंधक ऑफिसमध्ये नोंदणीकृत करण्यासाठी जमा करावा. म्हणजे तो करार कायदेशीररित्या वैध असेल.

४.भेट करारनाम्याच्या नोंदणीसाठी मसुदा तयार करणे.

भेट देणे ही मोफत कृती असल्याकारणाने भेट करारनाम्यामध्ये देण्यात येणारी देणगी किंवा भेट ही ऐच्छिक आणि सक्ती न करता देण्यात येते आहे हे नमूद केलेले असावे. शिवाय भेट देणारी व्यक्ती ही दिवाळखोर नसल्याचे आणि देण्यात येणारी भेट कोणत्याही परतफेडीची अपेक्षा न ठेवता देण्यात येते आहे हे देखील त्या भेट करारनाम्यामध्ये नमूद केलेले असावे. 

भेट करारनाम्याच्या मसुद्यामध्ये खालील गोष्टी या नमूद केलेल्या असाव्यात.

• मालमत्तेवरील ताबा

• विचार खंड (Consideration Clause)

• मालमत्तेबद्दलची माहिती

• भेट देणाऱ्या आणि घेणाऱ्या व्यक्तींबद्दलची माहिती

• मुक्त इच्छा असल्याची नोंद

• भेट स्वीकारणाऱ्या व्यक्तीचे हक्क

• भेट स्वीकारणाऱ्या व्यक्तीचे अधिकार आणि दायित्वे

• रद्द करण्याच्या बाबतीतला खंड (Revocation Clause)

• वितरण खंड

ही सगळी माहिती स्टॅम्प पेपरवर प्रिंट केलेली असावी. मुद्रांक शुल्क हे महाराष्ट्र मुद्रांक कायदा, २०१५ नुसार नियंत्रित केले जाते, तर नोंदणी शुल्क हे नोंदणी कायदा, १९०८ नुसार नियंत्रित केले जाते. महाराष्ट्रामध्ये मुद्रांक शुल्क हे कुटूंबातील सदस्यांसाठी ३%, इतर नातेवाईकांसाठी ५% आणि कृषी जमिन किंवा निवासी मालमत्तेसाठी २०० रुपये याप्रमाणे आकारण्यात येते. 

तो करारनामा वैध ठरण्यासाठी त्या करारनाम्याची उपनिबंधक ऑफिसमध्ये नोंदणी करणे आवश्यक आहे.

 
५.भेट करारनाम्याची नोंदणी करण्यासाठी लागणारी कागदपत्रे

• भेट करारनाम्याची सत्यप्रत

• ओळ्खपत्राचा पुरावा

• पॅन कार्ड

• आधार कार्ड

• मालमत्तेचा विक्री करारनामा

• मालमत्तेच्या करारासंबंधित इतर कागदपत्रे

६.भेट करारनाम्याची नोंदणी करण्यापूर्वी लक्षात घ्यायचे मुद्दे

• १८ वर्षांपेक्षा कमी वयाची व्यक्ती ही कायदेशीर करार करण्यासाठी असमर्थ असते. त्यामुळे वैध भेट करारनामा तयार होत नाही. पण त्या व्यक्तीच्या पालकांना त्या व्यक्तीच्या वतीने भेट स्वीकारण्याचा अधिकार असतो. 

• एकदा भेट द्यायच्या प्रक्रियेला सुरुवात केल्यानंतर ती प्रक्रिया मागे घेऊ किंवा रद्द करू शकत नाही. 

• भेट मिळणारी व्यक्ती नातेवाईकांना भेट देत असल्यास आयकर कायद्याप्रमाणे हा व्यवहार करमुक्त आहे. 


fill & click submit
to whatsapp us