Reading Time: 2 minutes
Expenditure Tax In India

Table of Contents

१.व्ययकर म्हणजे काय?

व्ययकर हा पाहायला गेलं तर आयकर सारखाच आहे. फक्त एक महत्वाचा फरक म्हणजे आयकर हा उत्पन्नावर आकरण्यात येतो, तर व्ययकर हा खर्चावर आकारण्यात येतो. 

सध्या असलेल्या कायद्यामध्ये दिल्याप्रमाणे व्ययकर हा एखाद्या व्यक्तीचा हॉटेलमध्ये राहण्यासाठी झालेला एकूण खर्च हा रु.३०००/- पेक्षा जास्त असेल तर त्यावर किंवा रेस्टॉरंटमधील शुल्कावरती करण्यात येईल. या शुल्कामध्ये बाकीचे शुल्क समाविष्ट नसतील जसे की, अन्न, पेय आणि इतर सेवा.

२.व्ययकर हा का लादला जातो?

कर टाळण्याची प्रवृत्ती ही सामान्यतः लोकांमध्ये दिसून येते. जसं की आयकर हा करदात्याच्या उत्पन्नावरती आकारण्यात येतो, तर करदाते त्यांच्या आयकर परताव्यामध्ये कमी उत्पन्न दाखवून त्यावर कमी कर भरण्याचे हरप्रकारे प्रयत्न त्यांच्याकडून केले जात असतात.

कर दायित्व कमी करण्यासाठी कराचे नियोजन आणि कर शमविणे हे कायदेशीर मार्ग आहेत. पण काही लोकांना करचोरी हा जास्त सोयीस्कर मार्ग वाटतो आणि तो एक प्रकारचा गुन्हा आहे. 

त्यामुळे जर आयकराची जागा व्ययकराने घेतली तर करचोरीचा उपयोग करून खरे उत्पन्न काळ्या पैशामध्ये बदलण्याचा कोणताच मार्ग नसेल. करदाते हे त्यांच्या सगळ्या खर्चावरती कर भरण्यास जबाबदार असतील आणि सगळा निधी हा अर्थव्यवस्थेच्या फायद्यासाठी उपलब्ध होईल. 

३.व्ययकर हा कशाप्रकारे आकारला जातो? 

व्ययकराचा दर

व्ययकराचा कायद्याप्रमाणे कर हा खालीलप्रमाणे आकारला जातो.

• हॉटेलमध्ये केलेल्या खर्चावरती १०%

• रेस्टॉरंटमध्ये केलेल्या खर्चावरती १५% 

हॉटेल आणि रेस्टॉरंटचे मालक हे हा जमा झालेला व्ययकर सरकारकडे जमा करण्यासाठी जबाबदार असतील. जे व्यवसाय अश्या सेवा देत आहेत, ते या व्याख्येमध्ये दिल्याप्रमाणे शुल्क आकारण्यायोग्य खर्चामध्ये येतात आणि तेच व्यवसाय व्ययकर आकरण्यासाठी आणि सरकारकडे जमा करण्यासाठी जबाबदार आहेत. 

४.करभरणा करण्याची देय तारीख

जबाबदार व्यक्तीने (हॉटेल किंवा रेस्टॉरंटचा मालक) वजावटीच्या महिन्यासाठी असलेला व्ययकर केंद्रीय सरकारला त्या महिन्याच्या पुढील महिन्यात १० तारखेपर्यंत भरावा. 

जर करदात्यांनी किंवा ग्राहकांनी सुनिश्चित वेळेत व्ययकर न भरल्यास त्या कराच्या रक्कमेची भरणा त्यांना त्यांच्या स्वतःच्या खात्यामधून करावी लागेल. 

५.परतावा जमा करण्याबद्दल माहिती

कर गोळा करणाऱ्याने कर परताव्यामध्ये खालील माहिती भरणे गरजेचे आहे. 

• शुल्क आकारण्यायोग्य खर्चाची मिळालेली एकूण रक्कम

• जमा व्ययकर

• सरकारला भरावयाची एकूण रक्कम

• बाकी लागू असलेली इतर अधिक माहिती 

व्ययकराचा परतावा हा आर्थिक वर्ष संपल्यानंतर म्हणजेच ३१ मार्च या तारखेच्या नंतर चार महिन्याच्या आत जमा करणे अनिवार्य आहे. 

६.भारत हे पाऊल का उचलत आहे?

व्ययकर लादण्याचे काही फायदे खालीलप्रमाणे आहेत.

६.१.व्ययकर हा आयकराच्या गैरव्यापकाची असमानता दूर करण्यास मदत करतो. 

६.२.व्ययकरामुळे होणारा अधिक खर्च किंवा पैशाची होणारी उधळपट्टी कमी होण्यास मदत होईल आणि महत्वाचं म्हणजे जास्त बचत होण्यास प्रोत्साहन मिळेल. 

६.३.अजून एक महत्वाचा फायदा म्हणजे नोकरी करणाऱ्या बायकांच्या उत्पन्नावर अधिक कराचे ओझे न लादले जाता वैयक्तिक कर आकारणीचा भाग हा कुटूंबामध्ये विभाजला जातो.

६.४.करचोरीचा अंकुश कमी करताना व्ययकर हा आपल्या आर्थिक विकासामध्ये सुधारणा करण्यास मदत करेल.

 

fill & click submit
to whatsapp us