Reading Time: 4 minutes
Key Changes under Income Tax Law in Union Budget 2022 Part 2

Table of Contents


१.कायद्याबद्दलच्या सामान्य प्रश्नांसाठी आवाहन द्यायचे नाही.

आयकर कायद्यामध्ये खंड ५२ प्रमाणे नवीन सेक्शन १५८अब समाविष्ट करण्याचे ठरवले आहे. ह्या सेक्शनमध्ये उच्च आणि सर्वोच्च न्यायालयासमोर असलेले प्रलंबित कायद्याबद्दलचे सामान्य प्रश्न आणि त्याबद्दलची प्रक्रिया देण्यात आली आहे. 

 

२.आधीच्या परताव्यामधील चुकांमध्ये सुधारणा करून अद्यतनित परतावा २ वर्षांमध्ये जमा करण्याबद्दलच्या असलेल्या तरतुदी

कोणतीही व्यक्ती, ज्याने सेक्शन १३९ च्या सबसेक्शन १ किंवा सबसेक्शन ४ किंवा सबसेक्शन ५ प्रमाणे (म्हणजेच देय तारखेच्या आधी भरलेला मूळ परतावा, उशीरा भरलेला परतावा, सुधारित परतावा अनुक्रमे) मूल्यांकन वर्षासाठी अद्यतनित आयकर परतावा स्वतःसाठी आणि इतर कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेसाठी त्याला आयकर परतावा भरायची परवानगी असल्यास तो मूल्यांकन वर्ष समाप्तीनंतर पुढील २ वर्षांमध्ये तो जमा करू शकतो. 

 

३.नवीन उत्पादित कंपनीसाठी १ अधिक वर्षासाठी कर आकारणीमध्ये सवलत

सेक्शन ११५बअब मधील सबसेक्शन २ मधील खंड अ प्रमाणे असे असणे आवश्यक आहे की, कर आकारणीमध्ये सवलतीच्या दरांचा फायदा मिळवण्यासाठी देशांतर्गत कंपन्यांची सुरुवात आणि रजिस्ट्रेशन हे १ ऑक्टोबर २०१९ ला किंवा त्यानंतर झालेले असले पाहिजे आणि उत्पादनाची सुरुवात ही ३१ मार्च, २०२३ ला किंवा त्याआधी झालेली असली पाहिजे.

 

या खंडामध्ये अशी सुधारणा प्रस्तावित केलेली आहे की, जी उत्पादनाला सुरुवात करण्याची तारीख ३१ मार्च ,२०२३ पर्यंत देण्यात आली आहे, त्या तारखेच्या ऐवजी ती तारीख ३१ मार्च, २०२४ मध्ये बदलण्यात यावी.

 

४.सरचार्जचे तर्कशुद्धीकरण

वैयक्तिक कंपन्या आणि असोसिएशन ऑफ पर्सन्स यांमधील असमानता नष्ट करण्यासाठी असोसिएशन ऑफ पर्सन्ससाठी सरचार्जचा दर हा १५% असा सुनिश्चित करण्यात आला आहे. 

 

कोणत्याही प्रकारची मालमत्ता हस्तांतरण केल्यावर मिळणाऱ्या दीर्घकालीन भांडवली नफ्यावरील सरचार्जचा दर हा १५% असा सुनिश्चित करण्यात आला आहे.

 

५.व्यवसायामध्ये झालेल्या अवांतर प्राप्तीच्या फायद्यावर कर आकारणी

नवीन सेक्शन १९४र हे ऍड करण्यात आलेले असून कोणतीही व्यक्ती इतर रहिवाश्याला अवांतर प्राप्तीचा लाभ देताना, मग त्याचे पैशामध्ये रूपांतर होत असो वा नसो, तो लाभ हा व्यावसायिक असो वा प्रोफेशनमुळे झालेला असो, ती सेवा देण्यापूर्वी मिळणाऱ्या प्राप्तीच्या एकूण रक्कमेमधून १०% या दराने कर वजा करणे आवश्यक आहे. 

 

जर अवांतर प्राप्तीची रक्कम ही २०,००० रुपयांपेक्षा कमी असेल, तर त्या रक्कमेमधून कराची वजावट ही करू नये. 

 

६.आयएफएससी युनिट्ससाठी कर प्रोत्साहन

• सेक्शन १० मधील खंड ४इ मध्ये अशी सुधारणा प्रस्तावित करण्यात आली आहे की, रहिवाशी नसलेल्या व्यक्तीला मिळणारे उत्पन्न किंवा भविष्यात मिळणारे उत्पन्न, जे आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्राने दिलेले ऑफशोअर डेरिव्हेटिव्ह इन्स्ट्रुमेंट किंवा ओव्हर द काउंटर डेरिव्हेटिव्ह हस्तांतरण करून मिळालेले असेल. हा व्यवहार सेक्शन ८०लअ मधील सबसेक्शन १अ मधील अटी आणि नियमांमध्ये बसायला हवा.

 

• आधीच्या मुद्द्यामध्ये दिलेल्या सेक्शनमधील खंड ४फ प्रमाणे रहिवाशी नसलेल्या व्यक्तीला आधीच्या वर्षामध्ये रॉयल्टी आणि व्याजाद्वारे मिळणारे उत्पन्न जे विमान भाड्याने देऊन मिळालेले आहे आणि ज्या उत्पन्नाची भरणा ही सेक्शन ८०लअ मधील सबसेक्शन १अ मध्ये दिल्याप्रमाणे आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्राने केली असल्यास, त्या केंद्राने त्याच्या व्यवहाराची सुरूवात ही ३१ मार्च, २०२४ ला किंवा त्याआधी केली असल्यास ते करसुटीसाठी पात्र आहेत.

 

• ह्या खंडामध्ये आता अशी सुधारणा करण्याचे प्रस्तावित केलेले आहे की, रहिवाशी नसलेल्या व्यक्तीला आधीच्या वर्षामध्ये रॉयल्टी आणि व्याजाद्वारे मिळणारे उत्पन्न जे जहाज भाड्याने देऊन मिळालेले आहे आणि ज्या उत्पन्नाची भरणा ही आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्राने केलेली असेल.

 

• ह्या सेक्शनमध्ये आता नवीन खंड ४ग ऍड करायचे ठरलेले असून त्यामध्ये असे देण्यात आले आहे की, रहिवाशी नसलेल्या व्यक्तीला सिक्युरिटीजच्या पोर्टफोलिओ मधून मिळणारे उत्पन्न किंवा वित्तीय उत्पादने आणि निधी जे त्या रहिवाशी नसलेल्या व्यक्तीच्या वतीने कोणत्याही पोर्टफोलिओ मॅनेजरकडून व्यवस्थापित किंवा प्रशासित केले जातात आणि ज्याचे खाते हे सेक्शन ८०लअ मधील सबसेक्शन १अ मध्ये दिल्याप्रमाणे आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्रामधील ऑफशोअर बँकिंग युनिटमध्ये ठेवलेले असावे. हे उत्पन्न हे भारताच्या बाहेरून आलेले असावे किंवा भविष्यात मिळणारे असावे आणि हे उत्पन्न हे भारतातून मिळणारे नसावे.

 

७.कोविड-१९ च्या उपचारासाठी केलेल्या खर्चाची आणि भरपाईची आयकराच्या आकारणीपासून मुक्तता

• कोणत्याही व्यक्तीला मिळालेली कोणतीही रक्कम ही त्या व्यक्तीच्या वैद्यकीय उपचारांसाठी केलेल्या खर्चाची असेल किंवा त्या व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्याच्या उपचारांसाठी केलेल्या खर्चाची असेल आणि ते आजारपण हे कोविड-१९ मुळे आलेले असेल. याबद्दलची अधिक माहिती ही केंद्र सरकारने सूचित केली आहे. त्या व्यक्तीला मिळणारी ही रक्कम त्या व्यक्तीचे उत्पन्न म्हणून मानण्यात येणार नाही.

 

• कोणतीही रक्कम जी मृत व्यक्तीच्या कुटूंबातील सदस्यांना त्या मृत व्यक्तीच्या नियोक्त्याकडून मिळालेली असेल किंवा ती रक्कम ही इतर व्यक्ती किंवा व्यक्तींकडून मिळालेली असेल, ज्याची एकूण रक्कम ही १० लाख रुपयांपेक्षा जास्त नसेल, जेथे मृत व्यक्तीच्या मरणाचे कारण हे कोविड-१९ मुळे आलेले आजारपण हे असेल आणि ती रक्कम ही मृत व्यक्तीच्या सदस्याला त्या व्यक्तीच्या मृत दिनांकापासून पुढील १२ महिन्याच्या आत मिळालेली आणि केंद्र सरकारने सूचित केलेल्या इतर अटींप्रमाणे मिळालेली असावी. ही त्या व्यक्तीला मिळालेली रक्कम त्या व्यक्तीचे उत्पन्न म्हणून मानण्यात येणार नाही. 

 

८.अचल मालमत्तेच्या विक्रीवर टीडीएसची आकारणी

आयकर कायद्याच्या सेक्शन १९४आयअ मधील खंड ५६, ज्यामध्ये शेतजमीन वगळता विशिष्ट अचल मालमत्तेचे हस्तांतरण करण्याबद्दल सुधारणा करण्याचे प्रस्तावित करण्यात आलेले आहे.

 

• दिलेल्या सेक्शनमधील सबसेक्शन १ प्रमाणे शेतजमीन वगळता कोणत्याही अचल मालमत्तेचे हस्तांतरण करून मिळणाऱ्या रक्कमेवर ती रक्कम जमा करताना किंवा त्या रक्कमेची भरणा करताना त्या रक्कमेवर १% या दराने आयकर आकारण्यात यावा.

 

• दिलेल्या सेक्शनमधील सबसेक्शन २ प्रमाणे अचल मालमत्ता हस्तांतरण करताना मिळणारी रक्कम ही ५० लाख रुपयांपेक्षा कमी असल्यास कराची आकारणी ही केली जाऊ नये. 

 

सुधारणा- दिलेल्या सेक्शनमधील सबसेक्शन १ मध्ये अशी सुधारणा करण्यात येते आहे की, शेतजमीन वगळता अचल मालमत्ता हस्तांतरण करून मिळणाऱ्या रक्कमेवर ती रक्कम जमा करताना किंवा त्या रक्कमेची भरणा करताना त्या रक्कमेवर १% या दराने गणना करण्यात आलेल्या कराची रक्कम आणि त्या मालमत्तेचे मुद्रांक शुल्क या दोन्हींपैकी जी रक्कम अधिक असेल, ती रक्कम आयकर म्हणून आकरण्यात येईल.


fill & click submit
to whatsapp us