Reading Time: 5 minutes
Interest Calculator Introduction in Form GSTR-3B

Table of Contents

करदात्यांनी योग्य कराची गणना करण्यासाठी आणि त्यात त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी सरकारने करदात्यांसाठी वस्तू आणि सेवा कराच्या फॉर्म ३ब मध्ये नवीन कार्यक्षम प्रणालीचा म्हणजेच व्याज गणनयंत्राचा परिचय केला आहे. ही प्रणाली करदात्याने जी कर दायित्वाची रक्कम कर परताव्यामध्ये दाखवली आहे, त्यावर प्रणाली व्युत्पन्न व्याजाची गणना करून देण्यास मदत करेल. जर करदात्याने विशिष्ट कालावधीतील वस्तू आणि सेवा कर परताव्याच्या फॉर्म ३ब मध्ये दाखवलेल्या कर दायित्वाच्या रक्कमेवर काही व्याज लागू होत असेल, तर तो फॉर्म वेबसाईटवर जमा केल्यानंतर त्या रक्कमेवरील व्याजाची गणना करण्यात येईल. 

 

प्रणाली व्युत्पन्न व्याजाची रक्कम ही पुढच्या कालावधीच्या वस्तू आणि सेवा कर परताव्यामधील फॉर्म ३ब मधील टेबल ५.१ मध्ये स्वयंचलित प्रणालीमुळे दिसू लागेल. ही सेवा ही वस्तू आणि सेवा कर परतावा देय तारखेच्या नंतर भरल्यास भरावे लागणारे विलंब शुल्क जसे स्वयंचलितरीत्या पुढील कालावधीच्या वस्तू आणि सेवा कर परताव्याच्या फॉर्म ३ब मध्ये दिसून येते त्याचप्रमाणे हे देखील आहे.

 

१.कायदेशीर तरतूद

केंद्रीय वस्तू आणि सेवा कर कायदा, २०१७ च्या सेक्शन ५० प्रमाणे व्याज हे वस्तू आणि सेवा कराच्या विलंबित भरण्यावरती भरावे लागते. वस्तू आणि सेवा कराच्या पोर्टलवर गणना होणारे व्याज हे केंद्रीय वस्तू आणि सेवा कर कायदा, २०१७ च्या तरतुदीप्रमाणे विकसित आणि सुधारित केले आहे.

 

२.व्याज गणनयंत्र

२.१.वस्तू आणि सेवा कर परताव्याच्या फॉर्म ३ब मध्ये विशिष्ट कालावधीसाठी नमूद केलेल्या विक्रीवरती केली जाणारी व्याज दायित्वाची गणना ही विशिष्ट कालावधीमध्ये इलेक्ट्रॉनिक कॅश लेजरला डेबिट केलेल्या म्हणजेच कराची भरणा रोखीमध्ये भरलेल्या रक्कमेवरती केली जाते.

 

२.२.आधीच्या कालावधीसाठी असलेली कर दायित्वाची रक्कम नंतरच्या वस्तू आणि सेवा कर परताव्याच्या फॉर्म ३ब मध्ये भरल्यास व्याजाची गणना ही पूर्ण कर दायित्वाच्या रक्कमेवर केली जाते. मग ती इलेक्ट्रॉनिक कॅश लेजर डेबिट करून भरणा केलेली असेल किंवा इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर डेबिट करून भरणा केलेली असेल. 

 

३.व्याजाच्या गणनेची स्वयंचलित प्रणाली

३.१.ह्या नवीन प्रणालीमध्ये करदात्याने त्याच्या विशिष्ट कालावधीसाठी असलेल्या वस्तू आणि सेवा कर परताव्याच्या फॉर्म ३ब मध्ये नमूद केलेल्या मूल्यांवर लागू असलेल्या कमीत कमी व्याजाची गणना करण्यात येते. ज्याप्रकारे सध्या विलंब शुल्क हे नंतरच्या कालावधीच्या वस्तू आणि सेवा कर परताव्यामध्ये स्वयंचलितरित्या दिसायला लागते, त्याचप्रमाणे प्रणालीने गणना केलेले व्याज हे पुढील कालावधीच्या परताव्यामधील टेबल ५.१. मध्ये दिसायला लागते.

 

३.२.प्रणालीने गणना केलेली व्याजाची मूल्ये जी पुढच्या कालावधीच्या वस्तू आणि सेवा कर परताव्याच्या फॉर्म ३ब मध्ये स्वयंचलितरित्या दिसणार आहेत, ती मूल्ये बदलता येतील अश्या प्रकारची पद्धत सध्या सुरवातीला ठेवलेली आहे. जमा केलेल्या वस्तू आणि सेवा कर परताव्याची PDF फाइल जी प्रणाली व्युत्पन्न करेल, त्यामध्ये दोन्ही मूल्ये दिलेली असतील. म्हणजेच प्रणालीने गणना केलेले व्याजाचे मूल्य आणि वापरकर्त्याने भरणा केलेले व्याजाचे मूल्य..

 

४.व्याज भरणा लागू असलेली प्रकरणे

४.१.जर वस्तू आणि सेवा कर परताव्यामधील फॉर्म ३ब देय तारखेच्या नंतर भरल्यास देय तारीख ते ज्यादिवशी परतावा जमा केला आहे, त्या तारखेपर्यंतच्या कालावधीसाठी व्याजाची गणना करण्यात येते.

 

४.२.जर आधीच्या कालावधीमधील कर दायित्वाची रक्कम या कालावधीच्या वस्तू आणि सेवा कर परताव्यामध्ये दाखविल्यास त्या कालावधीच्या परताव्याची देय तारीख ते दायित्व घोषित करण्यापर्यंतची तारीख यामधील कालावधीसाठी व्याजाची गणना करण्यात येईल. म्हणूनच या परताव्यामधील ही नवी प्रणाली करदात्यांना कालावधीप्रमाणे ऐच्छिकरित्या त्यांचे कर दायित्व घोषित करायला देते आणि समजा या परताव्यामध्ये तुम्ही मागील कालावधीचे कर दायित्व घोषित केल्यास त्या कालावधीच्या देय तारखेपासून ते सध्याच्या तारखेपर्यंत व्याजाची गणना त्या प्रणालीमध्ये स्वयंचलितरित्या केली जाईल.

 

या नवीन प्रणालीमुळे मूल्यांकनाच्या वेळी होणारे विवाद कमी करण्यास मदत होईल. 

 

५.कर दायित्वाचे ब्रेकअप- चालू शिवाय आधीच्या कालावधीसाठी
५.१.वस्तू आणि सेवा कर परताव्यामधील फॉर्म ३ब मध्ये कराच्या कालावधीप्रमाणे माहिती भरणे.

सध्या वस्तू आणि सेवा कर परताव्यामधील फॉर्म ३ब मध्ये करदात्यांना सध्याच्या कालावधीच्या कर दायित्वासोबत मागील कालावधीचे कर दायित्व देखील त्या सोबत दाखवता येते. कालावधीप्रमाणे कर दायित्वाचे ब्रेकअप दाखवण्याचा पर्याय तेथे उपलब्ध नाही. म्हणून करदात्यांसाठी व्याजाची योग्य ती गणना करण्यासाठी कालावधीप्रमाणे कर दायित्व दाखवण्यासाठी नवीन प्रणालीचा परिचय करून देण्यात आला आहे.

 

५.२.कर दायित्वाच्या रक्कमेचे ब्रेकअप (ऐच्छिक)

वरील दिल्याप्रमाणे वस्तू आणि सेवा कर परताव्याच्या फॉर्म ३ब मध्ये नवीन बटण ऍड करण्यात आलेले आहे आणि ते म्हणजे कर दायित्वाच्या रक्कमेचे ब्रेकअप (ऐच्छिक) आणि हे बटण फक्त त्या करदात्यांसाठी आहे जे मागील कालावधीची कर दायित्वाची रक्कम सध्याच्या कालावधीच्या कर परताव्यामध्ये दाखवत आहेत. जे करदाते फक्त सध्याची कर दायित्वाची रक्कम या कालावधीच्या वस्तू आणि सेवा कर परताव्याच्या फॉर्म ३ब मध्ये दाखवत असतील, ते करदाते हे बटण दुर्लक्षित करून नेहमीप्रमाणे त्यांचा परतावा भरू शकतात. 

 

६.वापरकर्त्यांच्या अनुभवातील बदल

६.१.जे करदाते देय तारखेच्या आधी त्यांच्या परताव्यामध्ये त्या सध्याच्या कालावधीशी निगडीत कर दायित्वाची माहिती भरत असतील, त्यांना ही नवीन प्रणाली लागू नाही आहे.

 

६.२.जे करदाते देय तारखेच्या नंतर त्यांच्या परताव्यामध्ये कर दायित्वाची माहिती भरत असतील, त्यांना एक पॉप अप मेसेज दिसेल की, आधीच्या कालावधीच्या कराच्या रक्कमेचे ब्रेकअप द्यावे. ज्या करदात्यांना आधीच्या कालावधीच्या कर दायित्वाची माहिती परताव्यामध्ये भरायची असेल, त्यांनी ती माहिती भरावी. सगळी कर दायित्वाची माहिती ही सध्याच्या कालावधीची असल्यास त्या करदात्यांनी तो पॉप अप मेसेज दुर्लक्षित करावा.

 

ही नवीन प्रणाली करदात्यांना वस्तू आणि सेवा कर परताव्यामधील फॉर्म ३ब मध्ये आकारल्या जाणाऱ्या व्याजाची गणना अचूक होण्यासाठी सुरू केलेली आहे. 

 

७.वस्तू आणि सेवा कर परताव्यामधील फॉर्म ३ब मध्ये व्याजाची गणना करण्याचे वैशिष्ट्य

७.१.वस्तू आणि सेवा कर परताव्यामधील फॉर्म ३ब मध्ये कर दायित्वाचे ब्रेकअप (ऐच्छिक) बटण- वस्तू आणि सेवा कर परताव्यामधील फॉर्म ३ब मध्ये पेमेंटच्या पानावर कर दायित्वाचे ब्रेकअप (ऐच्छिक) असे नवीन बटण ऍड करण्यात आले आहे. हे बटण परताव्यामधील पेमेंटच्या पानावर टेबल ६.१. च्या खाली ऍड करण्यात आलेले आहे. 

 

७.२.हे नवीन बटण जेव्हा तुम्ही ‘पेमेंट करा किंवा लेजरला क्रेडिट पोस्ट करावे.’ या बटणावर क्लिक केल्यावर इनेबल होईल. करदात्याने या कालावधीच्या कर दायित्वाचे पेमेंट केल्यानंतर कालावधीप्रमाणे कर दायित्वाच्या रक्कमेचे ब्रेकअप भरण्यासाठीचे पेज त्याला दिसायला लागते. 

 

७.३.हे बटण वस्तू आणि सेवा कर परतावा जमा करण्याच्या पानावर देखील दिसून येते.

 

७.४.ह्या बटणावर क्लिक केल्यावर करदात्याला या कालावधीच्या कर दायित्वाच्या रक्कमेचे ब्रेकअप भरण्यासाठी पेज दिसू लागते. तेथे दिलेल्या टेबलमध्ये जी रक्कम लागू असेल ती भरावी, फक्त त्या सगळ्या रक्कमांची एकूण रक्कम ही कर दायित्वाची रक्कम असायला हवी.

 

७.५.ही माहिती भरल्यानंतर परतावा ई-व्हेरिफिकेशन किंवा डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट या पर्यायाचा वापर करून जमा करा हा पर्याय इनेबल होतो. 

 

८.व्याजाची गणना करण्याचे सूत्र (केंद्रीय वस्तू आणि सेवा कर कायदा, २०१७ च्या सेक्शन ५० प्रमाणे)

व्याज दायित्व = कर दायित्व * परतावा भरावयाची देय तारीख आणि परतावा आता भरतानाची तारीख यामधील एकूण दिवस/ वर्षामधील एकूण दिवस * व्याजाचा दर 

 

करदाते जेवढे कालावधी त्यांच्या परताव्यामध्ये दाखवतील, तेवढ्या काळावधींसाठी हे वरील सूत्र वापरण्यात येईल. 

 

त्यानंतर प्रत्येक कालावधीच्या व्याज दायित्वाच्या रक्कमांची बेरीज करून एकूण व्याज दायित्वाच्या रक्कमेची गणना करण्यात येईल. 

 

९.स्वयंचलित व्याज

जी व्याजाच्या रक्कमेची गणना वरती दिल्याप्रमाणे केलेली आहे, ती रक्कम आणि आधीच्या कालावधीच्या परताव्याशी निगडीत असलेले विलंब शुल्क पुढील कालावधीच्या परताव्यामधील टेबल ५.१. मध्ये स्वयंचलितरीत्या दिसू लागेल. 

 

या व्याजाच्या रक्कमेची गणना कशी आणि कोणत्या प्रकारे केली आहे, ते कळण्यासाठी या पेजवरील प्रणाली व्युत्पन्न वस्तू आणि सेवा कर परतावा फॉर्म ३ब या बटणवर क्लिक केल्यावर दिसू शकेल.

 

१०.प्रणालीने सुचवलेल्या मूल्यांमध्ये करदाते बदल करू शकतात.

पोर्टल प्रणाली व्युत्पन्न रक्कमेमध्ये बदल करताना वापरकर्त्यांना थांबवत नाही. ती रक्कम करदाते वास्तविक रक्कमेपेक्षा कमी करत असल्यास प्रणाली त्यांना तशी चेतावनी देते. ती रक्कम वास्तविक रक्कमेपेक्षा कमी केल्यास ती रक्कम असलेली पूर्ण ओळ व प्रणाली व्युत्पन्न मूल्येदेखील लाल रंगाची दिसू लागतात. याचे कारण करदात्याला चूक करताना टाळणे हे असते. 

 

जर करदाते व्याजाची रक्कम वास्तविक रक्कमेपेक्षा कमी करून परतावा जमा करत असल्यास व्याजाचे बटण लाल रंगाचे दिसायला लागते. शिवाय प्रणाली देखील त्याबद्दल वापरकर्त्याला तशी चेतावनी देते. 

 

ह्या सगळ्या चेतावन्या दिल्यानंतर देखील बदललेल्या व्याजाच्या मूल्यांसोबत करदात्याला ती प्रणाली त्याचा वस्तू आणि सेवा कर परताव्याचा फॉर्म ३ब भरण्यापासून थांबवत नाही.

 

११.परतावा जमा करण्यापूर्वी दिसणारा माहितीपूर्वक किंवा चेतावनी स्क्रिन

परतावा जमा करण्यापूर्वी करदात्याला एक माहितीपूर्वक किंवा चेतावनी स्क्रिन दिसेल. त्या स्क्रिनवर असे लिहिलेले असेल की, जर कर परताव्यामध्ये दिलेल्या कर दायित्वाच्या रक्कमेमध्ये आधीच्या कालावधीशी निगडीत कर दायित्वाची रक्कम असल्यास त्या रक्कमेचे तसे ब्रेकअप त्यामध्ये द्यावे.

 

fill & click submit
to whatsapp us