Reading Time: 3 minutes
Change in PAN Jurisdiction and Its Right Procedure

Table of Contents

१.मूल्यांकन अधिकारी म्हणजे कोण?

प्रत्येक करदाता हा एका मूल्यांकन अधिकाऱ्याच्या अधिपत्याखाली येतो. ज्या मूल्यांकन अधिकाऱ्याकडे त्याच्या बाबतीतले आयकरशी निगडीत निर्णय घेण्याचा आणि त्याच्या आयकरशी निगडीत मूल्यांकन करण्याचा कायदेशीर अधिकार त्याच्याकडे असतो. मूल्यांकन अधिकारी हे वेगवेगळ्या पदांवर असतात. जसं की, आयकर अधिकारी, अतिरिक्त अधिकारी, संयुक्त आयुक्त, उपायुक्त, इत्यादी.

करदात्याच्या पॅन नंबर वरून मूल्यांकन अधिकाऱ्याची नियुक्ती केली जाते. प्रत्येक पॅन कार्ड हे मूल्यांकन अधिकारी कोड सोबत जोडलेले असते आणि त्या निगडीत भौगोलिक माहिती देखील दिलेली असते.

शिवाय वेगवेगळ्या कारणांसाठी तुम्हाला तुमच्या मूल्यांकन अधिकाऱ्यासोबत संपर्क करावा लागतो. जसं की, आयकर परताव्याशी संबंधित समस्या, कर मागण्यांच्या थकबाकीला प्रतिसाद, आयकर परतावा मूल्यमापन. शिवाय मूल्यांकन अधिकाऱ्याला दंड आकारणे आणि माफ करणे असे दोन्ही अधिकार त्याच्याकडे असतात. अश्या सगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला तुमच्या मूल्यांकन अधिकाऱ्यासोबत संपर्क करावा लागतो. या मूल्यांकनाच्या ऑनलाइन पद्धतीमुळे ही प्रक्रिया अखंड स्वरूपाची होण्यास मदत झाली आहे, पण मूल्यांकन अधिकारीमधील बदलासाठी तुम्हाला विशिष्ट प्रक्रियेचे अनुसरण करावे लागतील. 

 

२.मूल्यांकन अधिकारी किंवा पॅन कार्डच्या अधिकारी क्षेत्रातील बदल

करदाते खालील कारणांमध्ये त्यांच्या मूल्यांकन अधिकाऱ्यामध्ये बदल करू शकतात. 

• निवासी पत्त्यामध्ये बदल असेल तेव्हा

• मूल्यांकन अधिकाऱ्याची वागणूक अव्यावसायिक असेल तेव्हा

 
३.निवासी पत्त्यातील बदलामुळे मूल्यांकन अधिकाऱ्यामधील बदल

जेव्हा करदात्याच्या निवासी क्षेत्रामध्ये बदल होतो, तेव्हा त्याला त्याच्या इन्कम टॅक्स पोर्टलवरील माहितीमध्ये देखील सुधारणा करावी लागते आणि त्याबद्दल आयकर विभागाला देखील कळवावे लागते. फक्त निवासी पत्त्यातील बदलामुळे परस्पर तुमच्या अधिकार क्षेत्रामध्ये बदल हा होत नाही. त्यासाठी तुम्हाला तुमच्या अधिकार क्षेत्रामधील मूल्यांकन अधिकाऱ्याला तुमच्या निवासी पत्त्यातील बदलासाठी विनंती पत्र लिहावे लागते. 

आता वर्तमानात असलेला मूल्यांकन अधिकारी आणि नवीन मूल्यांकन अधिकारी अशा दोघांचे समाधान झाल्यावरती वर्तमानातील मूल्यांकन अधिकारी हस्तांतरण प्रक्रियेला आणि तुमची कागदपत्रे नवीन मूल्यांकन अधिकाऱ्याकडे हस्तांतरण करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करतो आणि तुमचे पॅन हे नवीन मूल्यांकन अधिकाऱ्याकडे स्थलांतरित करतो. 

करदात्याच्या निवासी पत्त्यातील बदल कळवण्यासाठी त्याला खालील प्रक्रियेचे अनुसरण करावे लागते:

१.NSDL साईटला म्हणजेच https://tin.tin.nsdl.com/pan2/ ला भेट द्यावी आणि पॅन कार्डच्या निवासी पत्त्यातील बदलासाठी अर्ज करावा. 

२.तेथे हवी असलेली सगळी माहिती भरावी आणि कागदपत्रे जमा करावीत.

३.भरलेला फॉर्म जमा करून दिलेली रक्कम भरावी. फॉर्म जमा केल्यावर तुम्हाला त्या फॉर्मची पावती मिळेल.

४.त्या पावतीची प्रिंट काढावी, त्यावर तुमचा फोटो चिकटवून त्यावरती तुमची सही करावी.

५.ऑनलाइन अर्जानंतरच्या १५ दिवसात ती पावती योग्य त्या कागदपत्रांसोबत NSDL ला पाठवावीत.

ही वरील दिलेली प्रक्रिया झाल्यावर तुम्हाला खालील प्रक्रिया करावी लागेल.

१.तुमच्या वर्तमानातील मूल्यांकन अधिकाऱ्याला तुमच्या निवासी पत्त्यातील बदलाचे कारण नमूद केलेला एक अर्ज करावा.

२.नवीन मूल्यांकन अधिकाऱ्याला त्याने वर्तमानातील मूल्यांकन अधिकाऱ्याला या बदलासाठी अर्ज करण्यासाठी विनंती अर्ज करावा.

३.नवीन मूल्यांकन अधिकाऱ्याने विनंती अर्ज मंजुर केल्यानंतर तो अर्ज पुढे आयकर आयुक्तांना पाठवण्यात येतो.

४.आयकर आयुक्ताने अर्जाला मंजुरी दिल्यानंतर तुमचा मूल्यांकन अधिकारी हा वर्तमानातील अधिकाऱ्यापासून ते नवीन अधिकाऱ्यामध्ये बदलण्यात येतो.

वरील अर्ज लिहिल्यानंतर आणि मूल्यांकन अधिकाऱ्यामधील बदलाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुमच्या मूल्यांकन नोंदी ह्या वर्तमानातील अधिकार क्षेत्रातील मूल्यांकन अधिकाऱ्याकडून नवीन अधिकारी क्षेत्रातील मूल्यांकन अधिकाऱ्याकडे हस्तांतरित करण्यात येतात. 

 
४.मूल्यांकन अधिकाऱ्याच्या अव्यावसायिक वागणूकीमुळे मूल्यांकन अधिकाऱ्यामधील बदल

मूल्यांकन अधिकाऱ्यामधील बदलाचे अजून एक कारण म्हणजे वर्तमानातील मूल्यांकन अधिकारी त्याची कर्तव्ये व्यवस्थितरीत्या न बजावणे किंवा करदात्यासोबतची अकार्यक्षम वागणूक. या अश्या परिस्थितीमध्ये तुम्ही मूल्यांकन अधिकाऱ्यामधील बदलासाठी खालीलप्रमाणे अर्ज करू शकता:

१.सगळी परिस्थिती आणि तुम्ही तुमच्या वर्तमानातील मूल्यांकन अधिकाऱ्यासोबत समाधानी का नाही आहात याची कारणे लिहिलेला अर्ज आयकर लोकपालाला करावा. त्या तक्रारीच्या अर्जासोबत योग्य ती कागदपत्रे देखील जोडावीत. 

महत्वाची माहिती- अर्जामध्ये तक्रारदाराचे नाव, पत्ता, तक्रार अर्ज करण्याचे नक्की असलेले कारण आणि त्या अधिकाऱ्याचे नाव ज्याच्याविरुद्ध तुम्ही तक्रार करत आहात ही सगळी माहिती नमूद करावी.

२.एकदा आयकर लोकपालाने अर्जाला मंजुरी दिल्यानंतर तो त्या अर्जावर त्याची सही करतो आणि तो अर्ज पुढे आयकर आयुक्ताकडे पाठवतो. 

३.आयकर आयुक्ताच्या मंजुरीनंतर तुमच्या मूल्यांकन अधिकाऱ्यामध्ये बदल होतो. 

 

५.अधिकारी क्षेत्र आणि मूल्यांकन अधिकारी कोड कसा जाणून घ्यावा?

तुम्ही तुमचे अधिकार क्षेत्र इन्कम टॅक्स वेबसाईटवर अगदी सहजरित्या आणि खालीलप्रमाणे दिलेल्या काही सोप्या पायऱ्यांचा अवलंब करून तपासू शकता.

१.इन्कम टॅक्सच्या अधिकृत वेबसाईटला म्हणजेच https://www.incometax.gov.in/iec/foportal/ ला भेट द्यावी.

२.त्या वेबसाईटवरील ‘Know Your AO’ या पर्यायावरती क्लिक करावे.

३.तेथे अनिवार्य माहिती म्हणजेच पॅन आणि मोबाईल नंबर ही माहिती भरावी आणि ‘Submit’ या बटणावरती क्लिक करावे. 

४.तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एक OTP मिळेल. तो OTP साईटवर दिलेल्या जागेवरती भरावा आणि ‘Submit’ या बटणावरती क्लिक करावे.

५.पॅनच्या अधिकार क्षेत्राबद्दलची माहिती तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर दाखवण्यात येईल. 

या प्रक्रियेबद्दल अधिक माहिती हवी असल्यास आयकर विभागाने दिलेली अधिकृत PDF फाइलदेखील तुम्ही पाहू शकता. त्या PDF फाइलची लिंक खालीलप्रमाणे-

https://www.incometaxindia.gov.in/Documents/pan-migration.htm

fill & click submit
to whatsapp us