Reading Time: 2 minutes
Taxation on Crypto Currencies

Table of Contents

 

१.प्रस्तावित कर शासन- 

१.१.आभासी डिजिटल मालमत्ता हस्तांतरण करताना मिळणाऱ्या उत्पन्नावर १ एप्रिल, २०२२ पासून ३०% या दराने कर आकारणी करण्यात येईल.

१.२.१ जुलै, २०२२ पासून आभासी डिजिटल मालमत्ता हस्तांतरण करताना मिळणारे उत्पन्न हे निश्चित आर्थिक मर्यादेपेक्षा जास्त असल्यावर त्यासाठी करण्यात आलेल्या खर्चावरती १% या दराने टीडीएस आकरण्यात येईल. 

१.३.आभासी डिजिटल मालमत्तेच्या भेटवस्तूवरील कर आकारणी ही प्राप्तकर्त्याच्या हातात केली जाते.

 

२.कराचा दर- 

प्रत्येक आभासी डिजिटल मालमत्तेवर खाली दिलेल्या गोष्टी या गृहीत न धरता त्या मालमत्तेचे हस्तांतरण करुन मिळणाऱ्या उत्पन्नावर ३०% या दराने कर आकारणी करण्यात येते. 

२.१.मालमत्तेचा प्रकार म्हणजेच अल्पकालीन आणि दीर्घकालीन लाभामध्ये काही फरक करण्यात येणार नाही. 

२.२.उत्पन्नाचा प्रकार (व्यावसायिक, भांडवली लाभ किंवा इतर स्रोतांपासून मिळणारे उत्पन्न)

२.३.कराची स्लॅब ही यामधील करदात्याला देखील लागू आहे. 

 

३.कर आकारणी- 

आभासी डिजिटल मालमत्तेमधून मिळणाऱ्या उत्पन्नावर कर आकारणी तेव्हाच होते, जेव्हा आभासी डिजिटल मालमत्तेची विक्री ही नफ्यासाठी केली जाते आणि त्या विक्रीमधून झालेला नफा हा तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होतो. याचाच अर्थ जर एखाद्या व्यक्तीच्या ताब्यात मालमत्ता तशीच असेल, तर अवास्तव लाभावरती कर आकारणी ही केली जात नाही. 

 

४.आभासी डिजिटल मालमत्तेच्या भेटवस्तूंवरील कर आकारणी- 

जर एखाद्या केसमध्ये आभासी डिजिटल मालमत्तेच्या स्वरूपातील भेटवस्तू एखाद्या व्यक्तीला देऊ केल्यास त्या भेटवस्तूवरती प्राप्तकर्त्याच्या हाती ३०% या दराने कर आकारणी करण्यात येतईल. त्यामध्ये सरचार्ज आणि सेसदेखील ऍड करण्यात येईल. 

 

५.वजावटी, सेट ऑफ आणि कॅरी-फॉरवर्ड- 

५.१.संपादन करण्याच्या खर्चाशिवाय इतर खर्च हा आभासी डिजिटल मालमत्तेमध्ये वजावट म्हणून लागू होत नाही. 

५.२.आभासी डिजिटल मालमत्ता हस्तांतरण करताना झालेले नुकसान हे इतर कोणत्याही उत्पन्नासमोर सेट ऑफ होऊ शकत नाही. 

५.३.आभासी डिजिटल मालमत्ता हस्तांतरण करताना झालेले नुकसान हे पुढील आर्थिक वर्षामध्ये कॅरी-फॉरवर्ड करू शकत नाही. 

 

६.वर्तमानातील मालकीच्या धारणेवरील आणि आधीच्या कमाईवरील कर आकारणी- 

जर आधीची कमाई ही दिनांक ३१ मार्च, २०२२ नंतर मिळाली असल्यास त्यावर कर आकारणी ही करण्यात येईल. म्हणजेच जर वर्तमानातील मालकीच्या धारणेची दिनांक ३१ मार्च, २०२२ रोजी किंवा त्यापूर्वी विक्री केल्यास सध्याची वर्तमानातील कर प्रणाली आभासी डिजिटल मालमत्तेमधून मिळणाऱ्या लाभासाठी लागू होईल आणि जर त्या मालमत्तेची विक्री ही ३१ मार्च २०२२ नंतर केल्यास त्या मालमत्तेच्या हस्तांतरणामधून मिळालेल्या लाभावर ३०% या दराने कर आकारणी होईल.

 

उदाहरणार्थ- आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये झालेल्या व्यवहारांसाठी- 

व्यवहार १- बिटकॉइन हे ५ लाखाला खरेदी केले आणि ६ लाखाला विकले. 

व्यवहार २- इथेरीयम हे २ लाखाला खरेदी केले आणि १.५ लाखाला विकले. 

वरील दिलेल्या दोन्ही व्यवहारांचे निव्वळ उत्पन्न हे ५०,००० रुपये इतके आहे. [रु.१,००,००० (व्यवहार १ मधून मिळालेला नफा) – रु.५०,००० (व्यवहार २ मधून झालेला तोटा)] 

 

आभासी डिजिटल मालमत्तेमधून मिळालेल्या नफ्यावरील कर भरणा = रु. ५०,००० वरती ३०% = रु.१५,००० (सरचार्ज आणि सेसदेखील या रक्कमेमध्ये ऍड करण्यात येईल.) 

 

 

जर कोणत्याही आर्थिक वर्षात क्रिप्टो करन्सीच्या हस्तांतरणामधून मिळणारे निव्वळ उत्पन्न हे काहीच नसेल, तर कोणतीही कर भरणा ही केली जाणार नाही. 

 

fill & click submit
to whatsapp us