Reading Time: 3 minutes
How to Respond to Notice under Section 143(2)

Table of Contents

 

.सेक्शन १४३() च्या अंतर्गत पाठवलेली नोटिस म्हणजे काय?

जेव्हा आयकर विभागाला तुमच्या आयकर परताव्यामध्ये काही छोट्यामोठ्या विसंगती आढळून येतात, तेव्हा त्यांच्याकडून त्या व्यक्तीला सेक्शन १४३() च्या अंतर्गत नोटिस पाठवण्यात येते. या विसंगती या कमी दाखवण्यात आलेले उत्पन्न किंवा जास्त दाखवण्यात आलेले नुकसान याबद्दल असू शकतात. ती नोटिस ही तुम्ही कर हा योग्यप्रकारे आणि खऱ्या रक्कमेप्रमाणेच भरला आहे याची खात्री करण्यासाठी पाठवण्यात येते

.तुम्हाला त्या नोटिसबद्दल काय माहिती असणे गरजेचे आहे?

  • तुम्हाला ती नोटिस पीडिएफ फाइलमध्ये तुमच्या नोंदणीकृत इमेल आयडी वरती मिळते. शिवाय तुमच्या पोस्टल पत्त्यावर देखील पाठवण्यात येते
  • जर तुम्ही एखाद्या आर्थिक वर्षाचा आयकर परतावा भरला नसल्यास मूल्यांकन अधिकारी तुम्हाला सेक्शन १४३() च्या अंतर्गत नोटिस पाठवू शकत नाही. तो तुम्हाला सेक्शन १४२() च्या अंतर्गत नोटिस पाठवून आयकर परतावा जमा करण्याबद्दल सुचना देईल
  • तुम्हाला तुमच्या सगळ्या उत्पन्नाच्या स्त्रोतांचे पुरावे जमा करायला हवेत.
  • मूल्यांकन अधिकारी हा तपशीलवार चौकशी करतो

.ती नोटिस कशाप्रकारे कार्य करते?

..पायरी तुम्ही तुमचा आयकर परतावा जमा केला.

..पायरी मूल्यांकन अधिकाऱ्याने सेक्शन १४३() च्या अंतर्गत तुम्हाला नोटिस पाठवली

..पायरी तुम्ही किंवा तुमच्या कर प्रतिनिधीने मूल्यांकन अधिकाऱ्यासमोर तुमच्या या केसबद्दल युक्तिवाद मांडला आणि हवी असलेली सगळी कागदपत्रे घोषणापत्रे जमा केली

..पायरी सगळी कागदपत्रे जमा केल्यानंतर सेक्शन १४३() च्या अंतर्गत कर भरणा आहे की परतावा मिळणे आहे याबद्दल अंतिम निर्णय घेण्यात येतो

.सेक्शन १४३() च्या अंतर्गत असलेल्या नोटिसचे प्रकार

तुम्हाला सेक्शन १४३() च्या अंतर्गत खालील प्रकारांपैकी नोटिस मिळेल

..मर्यादित तपासणी ही तपासणी संगणकीकृत तपासणी प्रणालीचा वापर करून केली जाते. यामध्ये ठरलेल्या पॅरामीटर्स प्रमाणे केसेसची निवड करण्यात येते. ह्या अश्या केसेस असतात, ज्यांच्या परताव्यामध्ये चुकीची माहिती किंवा विसंगती असते. ही तपासणी काही विशिष्ट क्षेत्रासाठी मर्यादित असते. जसे की, परदेशी कर क्रेडिट किंवा मालमत्ता विक्री, इत्यादी

..पूर्ण तपासणी ही तपासणी पूर्णतः तुम्ही जमा केलेल्या परताव्याबाबतीत आणि निगडीत कागदपत्रांच्या संदर्भात असते. यामध्ये देखील संगणकीकृत तपासणी प्रणालीचा वापर करून केसेसची निवड करण्यात येते. जरी या प्रकारामध्ये व्याप्ती ही मर्यादित नसली, तरी मूल्यांकन अधिकारी हा एका विशिष्ट मूल्यांकन कालावधीच्या व्यतिरिक्त कागदपत्रे तपासू शकत नाही

..मॅन्युअल तपासणी ह्या तपासणीमध्ये केसेस या पूर्ण तपासणीसाठी निवडल्या जातात आणि त्या केसेस या थेट कराच्या केंद्रीय मंडळाने ठरवलेल्या निकषाप्रमाणे निवडल्या जातात. ह्या निकषामध्ये दरवर्षी बदल होत असतो.

.नोटिस पाठवण्यासाठी असलेली वेळेची मर्यादा

आयकर परतावा जमा केल्यानंतर सेक्शन १४३() च्या अंतर्गत नोटिस पाठवता येते. फक्त ही नोटिस पाठवण्यासाठी देखील एक कालावधी असतो. करदात्याने ज्या आर्थिक वर्षात त्याचा आयकर परतावा जमा केला आहे, ते आर्थिक वर्ष संपल्यानंतरच्या सहा महिन्यात नोटिस करदात्याला पाठवण्यात आली पाहिजे. म्हणजे उदाहरण बघायला गेलं तर, श्री. जोशी यांनी त्यांचा २०१८१९ या आर्थिक वर्षाचा आयकर परतावा हा दिनांक ३१ जुलै, २०१९ रोजी जमा केला. तर मूल्यांकन अधिकारी करदात्याला सेक्शन १४३() च्या अंतर्गत नोटिस दिनांक ३० सप्टेंबर, २०२० पर्यंत पाठवू शकतो. याचे कारण म्हणजे श्री. जोशी यांनी त्यांचा आयकर परतावा हा २०१९२० या आर्थिक वर्षात जमा केला आहे, ते आर्थिक वर्ष संपल्यानंतरच्या सहा महिन्यात मूल्यांकन अधिकारी सेक्शन १४३() च्या अंतर्गत त्यांना नोटिस पाठवू शकतो.

.जर तुम्ही त्या नोटिसला उत्तर देऊ शकला नाहीत तर काय होते?

तुम्ही त्या नोटिसला हलक्यात घेऊ शकत नाही. जर तुम्ही आयकर विभागाने पाठवलेल्या नोटिसला विशिष्ट कालावधीमध्ये उत्तर देऊ शकला नाहीत तर

  • जितके वेळा तुम्ही नोटिसला उत्तर द्यायला अपयशी ठराल, तितके वेळा सेक्शन २७२अ च्या अंतर्गत तुमच्यावर १०००० रुपयांची दंडात्मक कारवाई होऊ शकते.
  • मूल्यांकन अधिकारी त्याच्याकडे असलेल्या माहितीच्या आधारावर सेक्शन १४४ च्या अंतर्गत योग्य तो निर्णय घेऊन मूल्यांकन बंद करू शकतो
  • सर्वात मोठी करपात्र रक्कम गृहित धरण्यात येते. त्यामुळे जेवढी मोठी करपात्र रक्कम तेवढा अधिक कर आणि दंड तुम्हाला भरायला लागू शकतो
  • जर तुम्ही अधिक कराच्या मागणीला घेऊन त्या संदर्भात आयकर विभागासमोर वाद प्रस्थापित करायचे ठरवले असल्यास एकूण कर देय रक्कमेच्या २०% रक्कमेची भरणा उच्च अधिकाऱ्यांकडे आवाहन करण्याच्या आधी करावी लागते.
  • जर तुम्ही अपराधी आढळल्यास तुमच्यावर खटला दाखल होऊ शकतो तुम्हाला तुरुंगवास देखील होऊ शकतो
.अंतिम मूल्यांकन ऑर्डर पाठवण्यासाठी असलेली वेळेची मर्यादा

मूल्यांकन वर्ष

मूल्यांकन वर्ष संपल्यानंतर असलेली वेळेची मर्यादा

२०१७१८ किंवा त्याआधी

२१ महिने

२०१८१९  

१८ महिने

२०१९२० नंतर  

१२ महिने

 

fill & click submit
to whatsapp us